Rajanand More
अभिनेत्री स्वरा भास्कर ही सातत्याने आपल्या विधानांमुळे वादात असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी फहाद अहमद हे तिचे पती आहेत.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव यांच्याविषयी स्वराने नुकतेच अजब विधान केले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
डिम्पल यादव यांच्यावर क्रश असल्याचे स्वराने आपल्या पतीसमोरच एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते. त्याचे कारणही स्वराने सांगितले आहे. तुमचा कुणावर क्रश आहे, असे मुलाखतकाराने विचारले होते.
आपण सर्व बायसेक्सुअल असल्याचेही स्वरा म्हणाली होती. विषम लैंगिकता एक विचारधारा आहे, जी आपल्यावर तो आपल्यावर थोपविण्यात आली आहे.
स्वरा भास्करच्या या विधानांवरून मोठा वादही निर्माण झाला होता. सोशल मीडियातून तिच्यावर टीकेचा भडिमार झाला होता.
स्वराने या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडिया साईट बायो तिने अपडेट केला असून त्याचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे.
स्वराने बायोमध्ये म्हटले आहे की, मुलींच्या क्रशचे समर्थन करणारी. पार्ट टाईम अभिनेत्री, फुल टाइम ट्विटर पेस्ट, अराजकतेची राणी. सर्वनाशामध्येही आपली वाट शोधत आहे. मुक्त पॅलेस्टाईन.
डिम्पल यादव आणि स्वरा भास्कर यांची यापूर्वी भेट झाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघींच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.