Jagdish Patil
दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान एका व्यक्तीचे डोकं फोडल्याचा दावा स्वतंत्र भारद्वाज या तरूणाने केला आहे.
'मी एका व्यक्तीचं डोकं फोडलं, तरीही मी तुरुंगात गेलो नाही, कारण माझ्यावर भाजप नेत्यांचा आणि PM मोदींचा आशीर्वाद आहे,' असं त्याने म्हटलंय.
तर, "माझे शूज आणि काठीही दिलील पोलिसांची आहे. मी कोणताही अर्ज भरत नाही, तरीही पोलिसांसारखाच फिरतो," असा दावाही त्याने केला.
स्वतंत्र भारद्वाज याने एका पॉडकास्ट मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.
ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्यांच्या मुलीसह, CJP आणि विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.
तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेला स्वतंत्र भारद्वाज नेमका कोण आहे ते जाणून घेऊया.
स्वतंत्र भारद्वाज याचे भाजप नेत्यांचे जवळचे संबंध असून तो स्वत:ला हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणवतो.
"माझ्यावर हनुमानजींचा आशीर्वाद आहेच, कपिल मिश्रा माझ्या मोठ्या भावासारखे असून त्यांच्या एका फोनमुळे माझी सुटका झाल्याचं लोक म्हणतात."
तर चिराग पासवान आणि अगदी PM मोदीसुद्धा माझे मोठे भाऊ आहेत. मला सर्वांचा पाठिंबा आहे, असा दावा त्याने केला.
स्वतंत्र भारद्वाज हा बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असून तो सध्या दिल्लीत राहतो.
त्याने पॉडकास्टमध्ये सांगितले की, तो मिथिला ब्राह्मण असून पाटणा विद्यापीठाच्या आंदोलनापासून त्याचा आंदोलनातील इंटरेस्ट वाढला आहे.