पक्षाच्या पहिल्या महिला खासदार, भाजपमध्ये प्रवेश करताच जुन्या पक्षाची काढली पिसं

Rajanand More

स्वाती मालीवाल

राज्यसभेतील खासदार स्वाती मालीवाल यांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत आपच्या इतर सहा खासदारांनीही हातात कमळ घेतले आहे.

Swati Maliwal | Sarkarnama

गद्दारीचा शिक्का

आपकडून मालीवाल यांच्यासह सातही खासदारांवर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला आहे. मालीवाल या दिल्लीतून निवडून गेल्या आहेत.

AAP Swati Maliwal | Sarkarnama

जोरदार प्रत्युत्तर

मालीवाल यांनी मंगळवारी (ता. २८) आपच्या नेत्यांना पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिले. अरविंद केजरीवार यांच्या घरात PA कडून मारहाण झाली. त्यानंतर आपलीच बदनामी करण्यात आल्याचे मालीवाल म्हणाल्या.

Swati Maliwal | Sarkarnama

बोलू दिले नाही

राज्यसभेत ९५ टक्के उपस्थिती असून पक्षाने आपल्याला बोलण्याची संधी दिली नाही, अशी नाराजीही मालीवाल यांनी व्यक्त केली आहे. 

Swati Maliwal | Sarkarnama

तेच गद्दार

महिलेला मारहाण करणारे, तिला सन्मान न देणारे, पंजाबचा विश्वासघात करणारे, भ्रष्टाचाराचे दुकान उघडून बसलेले आणि आंदोलनाचा आत्मा विकणारे खरे गद्दार असल्याची मालीवाल यांची टीका.

Swati Maliwal | Sarkarnama

मोदी-शहांचे कौतुक

मालीवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचत त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Swati Maliwal | Sarkarnama

देशसेवा करणार

मालीवाल यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानताना आपण मेहनत, प्रामाणिकपणा आणि पूर्ण निष्ठेने देशाची सेवा करू, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

Swati Maliwal | Sarkarnama

दुसरा चॅप्टर

माझ्या आयुष्यातील पहिल्या चॅप्टरचा हा शेवट होता. दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्ही मला अधिक मेहनत आणि हिंमतीने देशासाठी काम करताना पाहाल, असे मालीवाल यांनी म्हटले आहे.

Swati Maliwal | sarkarnama

NEXT : ‘आप’ खासदारांच्या बंडानंतर काही तासांतच 'या' स्टार खेळाडूने हाती घेतला 'झाडू'

येथे क्लिक करा.