Akshay Sabale
आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्या आरोपांमुळे दिल्लीचं राजकारण तापलं आहे.
मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे माजी खासगी सचिव विभव कुमारांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. त्याप्रकरणी विभव कुमारांना अटकही केली आहे.
मालीवाल यांच्या आरोपांमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणात चर्चा सुरू आहे. त्यासह मालीवाल यांच्या संपत्तीबाबतही चर्चा सुरू रंगली आहे.
जानेवारी महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मालीवाल यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली. शेअर आणि बाँड मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याचं त्यांनी नमूद केलं.
जानेवारील मालीवाल यांनी आपली संपत्ती 19 लाख 22 हजार 519 रूपये असल्याचं घोषित केलं. त्यातील 8 लाख 90 हजार रूपये शेअर्समध्ये गुंतवले आहेत.
त्याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये मालीवाल यांनी 3 लाख रूपये गुंतवले आहेत. एलआयसीमध्ये 17 हजार 138 रूपये गुंतवले आहेत.
मालीवाल यांच्याकडे 6 लाख 62 हजार 450 रूपयांचे दागिने आहेत.
मालीवाल यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये एशियन पेंट्स, फाइन फाइन ऑरगॅनिक्स, पिडीलाइट, टीसीएस, टायटन आणि इतर अनेक शेअर्सचा समावेश आहेत.
स्वाती मालीवाल यांच्याकडे कोणतीच कार नाही किंवा कोणताही कर्ज नाही.