अमित शहांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी सोडचिठ्ठी; कोण आहे हा भाजपचा फायरब्रँड नेता?

Rajanand More

टी राजा सिंह

तेलंगणातील भाजपचे फायरब्रँड नेते आमदार टी. राजा सिंह यांनी सोमवारी (ता. 30) पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

T Raja Singh | Sarkarnama

का दिला राजीनामा?

प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवरून टी राजा यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. या पदासाठी ते इच्छूक होते. पण पक्षाने त्यांना डावलल्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

T Raja Singh | Sarkarnama

हिंदुत्ववादी चेहरा

टी. राजा हे भाजपचा तेलंगणातील हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या गोशामहल मतदारसंघातून सलग तीनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.

T Raja Singh | Sarkarnama

अमित शहांची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी हैद्राबादमध्ये होते. यावेळी टी राजा यांनी शहांची विमानतळावर भेट घेतली होती. प्रदेशाध्यक्षांची निवडीसाठी ही भेट असल्याची चर्चा रंगली होती.

T Raja Singh | Sarkarnama

महाराष्ट्रातही भाषणे

टी राजा हे मुस्लिमविरोधी विधानांमध्ये अनेकदा वादात अडकले आहेत. महाराष्ट्रातही त्यांच्या भडकाऊ भाषणांमुळे वाद निर्माण झाला आहे.

T Raja Singh | Sarkarnama

एकदा अटक

2022 मध्ये मुस्लिमविरोधी विधानांमुळे वाद निर्माण झाल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी टी. राजा यांना अटक केली होती.

T Raja Singh | Sarkarnama

पक्षातून निलंबन

पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपमधून त्यांना निलंबित करण्यात आले आहेत. काही महिन्यांतच त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले होते.

T Raja Singh | Sarkarnama

2007 पासून राजकारणात

टी राजा हे 2007 पासून राजकारणात असून पहिल्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी ते टीडीपीमध्ये होते. 2014 मध्ये ते भाजपमध्ये आले होते.

T Raja Singh | Sarkarnama

NEXT : आरक्षित, तत्काळ तिकीटाबाबत रेल्वेचा मोठा निर्णय

येथे क्लिक करा.