Rajanand More
भारतीय रेल्वेकडून तिकीटाच्या प्रक्रियेत तीन मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी हे बदल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रेल्वेकडून तत्काळ ट्रेन तिकीट, वेटिंग लिस्टसाठी आरक्षित जागांचा चार्ट लवकर तयार करणे आणि आरक्षित तिकीटांची यंत्रणा अद्ययावत करणे, असे तीन महत्वाचे बदल लवकरच होणार आहेत.
सध्या रेल्वेकडून आरक्षणाचा चार्ट गाडी सुटण्याच्या वेळेच्या चार तास आधी तयार केला जातो. आता आठ तास आधीच हा चार्ट तयार केला जाईल.
रेल्वेच्या या निर्णयामुळे वेटिंग तिकीट घेतलेल्या प्रवाशांना फायदा होणार आहे. आता त्यांना लवकरच याबाबत माहिती मिळू शकेल. तिकीट कन्फर्म नसल्याचे समजतात ते इतर पर्यायांचा विचार करू शकतात.
तत्काळ तिकीटाबाबत रेल्वेने महत्वाची घोषणा केली. 1 जुलैपासून केवळ व्हेरिफाईड यूझर्सलाच तत्काळ तिकीट बुक करता येईल. IRCTC चा संकेतस्थळ आणि मोबाईल अपवरून तिकीट बुक करता येईल.
तत्काळ तिकीटामध्ये आणखी एक महत्वाचा बदल करण्यात येणार आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस ओटीपी आधारित तत्काळ बुकींगची अंमलबजावणी केली जाणार आहे.
वापरकर्त्यांना त्यांची ओळख पटविण्यासाठी आधारसह आता डिजीलॉकरमध्ये असलेल्या राज्य सरकारच्या कागदपत्रांचाही वापर करता येणार आहे. त्याची अंमलबजावणीही 1 जुलैपासून होणार आहे.
यंत्रणेत सुधारणा केला जाणार असून एका मिनिटांत दीड लाख आरक्षित तिकीटे काढता येणार आहे. सध्या ही क्षमता केवळ 32 हजार एवढा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.