Ganesh Sonawane
तहव्वूर राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे.
मुंबईत झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणाने मदत केली होती.
26/11 मुंबई हल्ल्यानंतर एका वर्षानंतर FBI ने शिकागो येथून राणा याला अटक केली होती.
राणा आणि त्याचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली या दोघांनी मुंबईतली हल्ल्याच्या ठिकाणांची रेकी केली होती.
मुंबई हल्ल्यातील मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च सैन्य किताब देण्याची मागणी त्याने पाकिस्तान सरकारकडे केली होती.
स्वतःच्या प्रत्यर्पणाविरोधात त्याने अमेरिकेतील जवळपास सर्वच न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
तिथल्या सर्वोच्च न्यायालयात त्याचे अपिल फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला.
26/11 च्या हल्ल्याप्रकरणी एनआयए कडून त्याची चौकशी होणार आहे.