Mayur Ratnaparkhe
भाजप नेते नैनार नागेंद्रन बनणार तामिळनाडू भाजपचे १३ वे प्रदेशाध्यक्ष
याबाबत केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. विशेष म्हणजे आधी ते AIADMK पक्षात होते.
प्राप्त माहितीनुसार तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे.
नागेंद्रन हे २०१७मध्ये भाजपमध्ये सहभागी झाले होते.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी नागेंद्रन यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता.
२००१मध्ये पहिल्यांदा तिरुनेलवेली मतदारसंघातून AIADMK चे उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती.
जयललिता यांच्या नेतृत्वातील AIADMK सरकारमध्ये मंत्री होते.
नागेंद्रन यांनी २०१९ आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही नशीब आजमावले मात्र विजयी झाले नाही.