सरकारनामा ब्यूरो
अभिनेत्री तसेच अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) पक्षाच्या सरचिटणीस दिवंगत नेत्या जयललिता जयराम यांचा आज (24 फेब्रु.) जन्मदिवस आहे.
जयललिता यांचा जन्म कर्नाटकातील म्हैसूर येथील मेलुकोटच्या तमिळ अय्यंगार कुटुंबात झाला होता.
सहा वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या या दिवंगत नेत्यांनी तमिळनाडूच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवला होता.
चेन्नईतील बिशप कॉटन गर्ल्स हायस्कूल आणि सेक्रेड हार्ट मॅट्रिक्युलेशन स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते.
त्या एक हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थिनी असल्याने मॅट्रिकनंतर लगेच त्यांना भारत सरकारकडून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली.
शिक्षणानंतर त्यांनी विविध चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. नंतर त्या दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री बनल्या.
राजकारणी जयललिता या एक भरतनाट्यम नृत्यांगना, कथ्थक, मोहिनीअट्टम आणि मणिपुरी यांसारख्या इतर नृत्य प्रकारांमध्येही अव्वल होत्या.
त्यांचे अनुयायी त्यांना प्रेमाने 'अम्मा' नावाने संबोधत. 'अम्मा' म्हणजे आई आणि 'पुराची थलाईवी' म्हणजे क्रांतिकारी नेता असा याचा अर्थ आहे.
R