Rashmi Mane
डॉ. तनु जैन यांची प्रेरणादायी कहाणी! डॉक्टरकी नाकारून त्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवले आणि देशसेवेसाठी नवा मार्ग निवडला.
डॉ. तनु जैन उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील असून त्यांनी डेंटल सर्जरी (BDS) मध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे.
डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. कोचिंगशिवाय केवळ मेहनतीच्या जोरावर UPSC पास केली.
त्यांनी UPSC मध्ये ऑल इंडिया रँक 648 मिळवून AFHQ (Armed Forces Headquarters Services) मध्ये अधिकारी म्हणून काम सुरू केलं.
काही काळानंतर त्यांनी सरकारी नोकरी सोडून युवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेतला.
त्या सध्या Drishti IAS मध्ये इंटरव्यूअर, मोटिवेशनल स्पीकर आणि शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. त्या तरुणांमध्ये आत्मविश्वास आणि दिशा निर्माण करतात.
त्यांची कहाणी दाखवते की, जर ध्येय स्पष्ट असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल तर यश अटळ आहे. UPSC स्पर्धा परीक्षांचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या एक ज्वलंत उदाहरण आहेत.