सरकारनामा ब्यूरो
समर्पण, कठोर परिश्रम आणि कौटुंबिक पाठिंब्याने तनुश्री बनल्या IPS अधिकारी.
तनुश्री आधी आयकर अधिकारी होत्या, नंतर CRPF मध्ये गेल्या आणि शेवटी IPS केडर मिळवले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील शाळेत झाले.
बोकारो येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधून 12वीचे शिक्षण पूर्ण करताच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्या दिल्लीला गेल्या.
सुरुवातीला त्या केंद्रीय राखीव पोलिस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट म्हणून सामील झाल्या.
CRPF मध्ये असताना त्यांनी आयकर विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली, त्यात न जाता IPS होण्यासाठी त्यांनी यूपीएससीची तयारी केली.
पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत उत्तीर्ण होत त्यांची IPS केडरमध्ये निवड झाली.
सध्या त्या जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथे वरिष्ठ पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
तनुश्री या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.