Aslam Shanedivan
कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि लाखो विद्यार्थ्यांनी सोमवारी (२० जुलै) संसदेकडे कूच केली. यावेळी शिक्षण व्यवस्थेत सुधारणेसह शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मात्र यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांची धरपकड केली
तर पोलीस व रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवानांनी फोडलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्यांच्या धुरामुळे त्रास होताना दिसत आहे
यामुळे आता अश्रुधुराच्या नळकांड्यांच्या धुरामुळे कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यामुळे आरोग्याचा धोका वाढू शकतो का? प्रश्न असा अनेकांना पडला आहे.
या धुराचे कण श्वासावाटे आत गेल्यास ते श्वसनमार्गाच्या अस्तरावर परिणाम करतात. यामुळे श्वासनलिका अरुंद होऊन काहींना श्वासनाचा त्रास होऊ शकतो
अश्रुधुराच्या संपर्कात आल्याने डोळ्यांची जळजळ, पाणी येणे आणि डोळे लाल होण्यासह अंधत्व, काचबिंदू, डोळ्यांवर व्रण, मोतीबिंदूसारखे आजार होऊ शकतात.
तसेच नाक वाहणे, शिंका येणे, घशात जळजळ, सतत खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे हे देखील होऊ शकते.
तसेच त्वचा लाल होणे, जळजळ, खाज सुटणे आणि टोचल्यासारखे वाटू शकते.
दमा, हृदयरोग असलेले लोक, वृद्ध, लहान मुले आणि गर्भवती महिलांना जास्त धोका असतो.