Roshan More
बिहारचे पर्यावरणमंत्री आणि लालुंचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी प्रभू श्रीराम त्यांच्या स्वप्नात आले होते. ते 22 जानेवारीला ते अयोध्येत येणार नसल्याचा दावा केला आहे.
निवडणुका आल्या की मंदिराचा विषय येतो. निवडणुका पार पडल्यानंतर मंदिराला कोणी विचारत नाही, असे देखील तेजप्रताप म्हणाले.
सध्या अयोध्येत जे काही चाललंय ते ढोंग आहे. त्यामुळे श्रीराम तिकडे येणार नसल्याचे तेजप्रताप म्हणाले.
तेजप्रताप हे एकदा आपल्या कार्यालयात सायकलवरून आले होते. याविषयी त्यांनी सांगितले होते, की मुलायम सिंग त्यांच्या स्वप्नात आले होते. त्यानंतर त्यांनी सायकलवरून कार्यालयात येण्याचा निर्णय घेतला.
तेजप्रताप यादव यांनी गेल्या वर्षी भगवान श्रीकृष्ण यांचा रुद्रअवतार स्वप्नात पाहिल्याचे सांगितले होते. भगवान कृष्णासारखी देखील तेजप्रताप यांनी वेशभूषा केली होती.
भगवान शंकरासारखा पेहराव करत तेजप्रताप यांनी श्रावण महिन्यात पूजा केली होती. त्यामुळेदेखील ते चर्चेत आले होते.
थंडी वाढण्यासाठी नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य तेजप्रताप यांनी केले होते.
2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही. नरेंद्र मोदींचे सिंहासन हलणार आहे, अशी टीका यादव यांनी केली होती.