Rashmi Mane
लहानपणापासून अभ्यासात रस असणाऱ्या तेजस्वी यांना इंजिनिअर व्हायचे होते.
जेईई परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळाला.
तिथे शिकत असतानाच त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसचे आकर्षण वाटू लागले. मग त्यांनी ठरवले की आपल्याला आयएएस अधिकारी व्हायचे आहे.
2015 ला त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली होती, परंतु मुख्य परीक्षेत त्या नापास झाल्या होत्या.
पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर तेजस्वी राणा यांनी हार मानली नाही.
2016 मध्ये UPSC परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या 12वी रँक घेऊन IAS अधिकारी बनल्या.
आयएएस प्रशिक्षणानंतर त्यांना राजस्थान केडर देण्यात आले.
R