Sunil Balasaheb Dhumal
विधानसभा निवडणुकीत दोन टर्म मुख्यमंत्री राहिलेल्या के. चंद्रशेखर राव यांची सत्ता गेली.
तेलंगणात आता काँग्रेसचे रेवंथ रेड्डी मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केसीआर यांच्यावर काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचे केसीआर यांना खंडन करता आले नाही.
मुख्यमंत्री असूनही केसीआर मंत्रायलयाऐवजी फार्महाऊसमधून कारभार पाहत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
केसीआर यांना भेटण्यासाठी मंत्री, पदाधिकाऱ्यांना फार्महाऊसवरच बोलावले जात होते.
केसीआर यांच्या मंत्रिमंडळात मुलगा केटीआर, पुतण्याचा सहभाग होता.
मुलगी के. कविता खासदार आहेत. त्यांच्यावर दिल्ली लिकर घोटाळ्याचा आरोप आहे.
केसीआर यांनी विस्तारासाठी तेलंगणा राष्ट्र समिती हे पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती केले.