Chetan Zadpe
काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी आता तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
निवडणूक आयोगाने रेड्डी यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार रेड्डी यांनी 2014 च्या निवडणुकीनंतर अनेक मालमत्ता खरेदीचे व्यवहार केले आहेत.
2014 च्या नंतर त्यांची स्थावर मालमत्ता 4.44 कोटी रुपयांवरून 7.79 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
केवळ नऊ वर्षांच्या कालावधीत त्यांच्या संपत्तीत 3.48 कोटींची वाढ झाली आहे.
अलीकडेच त्यांनी राज्यातील सेरिलिंगमपल्ली येथे जमीन खरेदी केली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार चार वर्षांत त्यांच्या गुंतवणूक आणि शेअर्सचे मूल्य 51 लाखांवरून 1.75 कोटी रुपये झाले आहे. त्यांची पत्नी गीता रेड्डी यांच्याकडे 9.44 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.