Rajanand More
तेलंगणातील गडवाल मतदारसंघाचे आमदार असून भारत राष्ट्र समितीच्या तिकीटावर निवडून आले आहेत.
मागील महिन्यात रेड्डी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.
काही दिवसांपूर्वी ते बीआरएसच्या आमदारांसोबत दिसून आले होते. त्यांची घरवापसी होणार असल्याची जोरदार चर्चा होती.
रेड्डी यांच्या घरवापसीच्या चर्चेनंतर काँग्रेसमधील काही आमदारांनी नुकतीच त्यांची भेट घेत मन वळवण्याचा प्रयत्न केला.
तेलंगणातील सत्ता गेल्यानंतर बीआरएस पक्ष कमकुवत झाला असून रेड्डी यांच्यासह काही आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
बीआरएसचे नेते केटीआर त्यांनी रेड्डींचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. पण त्यांना यश आले नाही.
रेड्डी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची भेट घेत आपण काँग्रेसमध्ये असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
रेड्डी हे अजूनही बीआरएसचे आमदार आहे. त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे पक्षांतबंदी कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.