Pune Loksabha Election : रवींद्र धंगेकरांसाठी काँग्रेसच्या विदर्भातील 'या' आमदारांचा पुण्यात मुक्काम!

Mayur Ratnaparkhe

पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.

रवींद्र धंगेकरांच्या विजयाासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भाती दहा आमदार पुण्यात आणले आहेत.

अमरावतीमधील आमदार यशोमती ठाकूर यांची पुण्यातील मतदारसंघात निरीक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

नागपूरमधील सावनेरचे आमदार सुनील केदार यांचीही पुण्यातील मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली गेली आहे.

नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवलेले विकास ठाकरे यांचाही पुण्यात मुक्कामी दहा आमदारांमध्ये समावेश आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगडे हे देखील पुण्यात आले आहेत.

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांनाही पुण्यात आणलं गेलं आहे.

आमदार अमित झणक यांनाही काँग्रेसने धंगेकरांच्या प्रचारासाठी पुण्यात आणलं आहे.

आमदार राजू आवळे हे देखील काँग्रेसच्या विदर्भातील दहा आमदारांमध्ये आहेत.

NEXT : महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्ये PM मोदींनी परिधान केले खास फेटे, पाहा फोटो