ठाकरेंपासून ते मुंडेंपर्यंत...! महाराष्ट्राच्या राजकारणातील 'भाऊ-बहिणीं'चं अनोखं बाँडिंग... पाहा रक्षाबंधनाचे खास फोटो...

Deepak Kulkarni

राजकीय रक्षाबंधन

देशभरात सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्रातील राजकीय रक्षाबंधनही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो.

Maharashtra Political Rakshabandhan 2026 | Sarkarnama

सुषमा अंधारे उद्धव ठाकरे

रक्षाबंधनानिमित्त शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राखी बांधली.

Sushma Andhare And Uddhav Thackeray | Sarkarnama

मुंडे बंधू-भगिनी

राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपले बंधू व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केला.

Pankaja Munde Dhananjay Munde | Sarkarnama

मानलेला भाऊ

भाजप नेत्या पंकजा मुंडे या रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांना आपला मानलेला भाऊ मानतात. दरवर्षी न चुकता त्या जानकरांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करतात. अनेक वर्षांपासून हे दोन्हीही नेते बहीण भावाचं नातं जपतात.

Pankaja Munde Mahadeo Janjar | Sarkarnama

'शिवतीर्थ'वर रक्षाबंधन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ'वर रक्षाबंधन साजरे केले. त्यांना त्यांच्या बहीण जयजयवंती ठाकरे यांनी राखी बांधली. तर अमित ठाकरेंना शर्मिला ठाकरेंनी राखी बांधली.

Raj Thackeray Amit Thackeray | Sarkarnama

थोरातांचंं रक्षाबंधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथील ‘प्रभा’ निवासस्थानी आपली बहीण दुर्गा तांबे यांच्याशी पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला.

Balasaheb Thorat And Durga Tambe | Sarkarnama

महाडिकांचं सेलिब्रेशन..

भाजपचे राज्यसभा खासदार व कोल्हापूरच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ असलेले धनंजय महाडिक व त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या 'भीमा' बंगल्यावर एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधनसह सर्वच प्रमुख सण साजरा करते.

Bjp Dhananjay Mahadik | Sarkarnama

प्रसाद लाड चित्रा वाघ

भाजपच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भाजप आमदार प्रसाद लाड यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण पारंपरिक उत्साहात साजरा केला.

Prasad Lad And Chitra Wagh | Sarkarnama

तटकरे बंधू भगिनी

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपले बंधू, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा केला.

Aditi Tatkare And Aniket Tatkare | Sarkarnama

NEXT: भारताला मिळाला नवा LPG पुरवठादार; देशात गॅस स्वस्त होणार का?

LPG Gas In India | Sarkarnama
येथे क्लिक करा...