Pradeep Pendhare
बालाजी किणीकर ठाण्यातील अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असलेल्या अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.
कोणताही राजकीय वारसा नसल्याने 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा बालाजी किणीकर आमदार म्हणून शिवसेना पक्षाकडून निवडून आलेत.
एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत केलेल्या बंडात आमदार किणीकर सामील होते. सुरत व्हाया गुवाहाटी प्रवास केला होता.
घोषित संपत्ती, जंगम संपत्ती आणि स्थावर मालमत्ता धरून कोटीच्या घरात आहे.
जानेवारी 2022 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून किणीकर यांना समन्स देण्यात आले होते.
चुकीची माहिती देत तक्रार केल्याने समन्स नंतर ते मागे घेतल्याचे स्पष्टीकरण किणीकर यांनी दिले. त्यामुळे कोणतीही चौकशी आणि तपास झाला नाही.
आमदार किणीकर यांना जून 2022 मध्ये जीवे मारण्याची धमकीचे पत्र आले होते. त्यावेळी चांगलीच खळबळ उडाली होती.
अंबरनाथ मतदारसंघात समाजकंटकांकडून विकास कामांना विरोधात. पण माझी हत्या झाली, तरी एकनाथ शिंदेंशी एकनिष्ठ राहत साथ देणार असल्याची पोस्ट व्हायरल