सरकारनामा ब्यूरो
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा 'सर्जिकल स्ट्राईक'! पाच टर्म नगरसेवक आणि माजी महापौराला धूळ चारणारे शहाजी खुस्पे सध्या चर्चेत आहेत. तर चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया
शहाजी (गणेश) संपत खुस्पे हे मूळचे शिवसैनिक आहेत, त्यांनी समर्थ फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक समाजकार्य केली आहेत. विशेष म्हणजे, ही त्यांची पहिलीच निवडणूक होती आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी निवडणूक जिंकली.
खुस्पे यांच्यासमोर शिंदे गटाचे दिग्गज नेते अशोक वैती यांचे कडवे आव्हान होते. अशोक वैती हे 5 टर्म नगरसेवक, माजी महापौर आणि एकनाथ शिंदेंच्या जवळचे मानले जातात.
हा विजय विशेष आहे कारण.. प्रभाग 13 मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभदीप निवासस्थान आहे. ज्या भागात मुख्यमंत्री स्वतः राहतात, त्याच भागात मतदारांनी 'धनुष्यबाणा'ऐवजी 'मशाली'ला पसंती दिल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.
अटीतटीच्या लढतीत शहाजी खुस्पे यांनी 667 मतांनी विजय मिळवला. शहाजी खुस्पे यांना 12,860 मते मिळाली तर अशोक वैती यांना 12,193 मते मिळाली.
खुस्पे यांनी सुरुवातीला शिंदे गटाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र तिथे तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या दारात आव्हान उभे केले.
या ऐतिहासिक विजयानंतर खुस्पे यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, यावेळी राजन विचारे आणि केदार दिघे देखील उपस्थित होते.