Pradeep Pendhare
महायुती सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 22 हजार 364 फायलींचा निपटारा केला.
मुख्यमंत्री कार्यालयाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या अडीच वर्षात 23 हजार 674 फायली प्राप्त झाल्या होत्या.
राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाची ही आजवरची विक्रमी कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे.
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या तुलनेत दुप्पट फायलींचा निपटारा आणि तिप्पट कामांना मंजुरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.
उद्धव ठाकरेंपेक्षा दुप्पट वेगाने 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2024 या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फायलींचा निपटारा केला.
उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री असताना 11 हजार 227 फायली प्राप्त झाल्या होत्या. त्यातील केवळ 6 हजार 824 फायली मंजूर करण्यात आली.
ठाकरेंपेक्षा शिंदेंनी त्यांच्या कार्यकाळात तिप्पट कामांना मंजुरी देत राज्याच्या अर्थचक्राला गती दिल्याचा दावा होत आहे.
राज्यातील विकासकामांचे प्रस्ताव आणि जनहिताच्या फायली वेगाने पाठपुरावा करून मुख्यमंत्री कार्यालयाने मंजूर केल्या.