Pradeep Pendhare
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना 'ईडी'ने 21 मार्चला अटक झाली.
'ईडी'ने 10 दिवस त्यांच्याकडे चौकशी केली, त्यानंतर एक एप्रिलला तिहार तुरुंगात पाठवले.
सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना 10 मे रोजी 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर सोडण्यात आलं.
निवडणुकीनंतर 2 जूनला त्यांना पुन्हा तिहार कारागृहात सरेंडर केले होतं. ही 21 दिवसांची सुटका वगळल्यास केजरीवाल एकूण 156 दिवस कारागृहात राहिलेत.
अरविंद केजरीवाल यांना खऱ्या अर्थानं 177 दिवसांनंतर जामीन मिळाला आहे.
माझ्यासाठी लाखो लोकांनी प्रार्थना केली होती. त्यांच्या प्रार्थनेमुळे आज बाहेर आलो आहे.
कारागृहदेखील मनोबल तोडू शकले नाही. ईश्वराकडे प्रार्थना आहे की, अशी शक्ती देत, मार्ग दाखवत राहो.
देशाची सेवा करताना देशात फूट पाडणाऱ्या आणि देशाला कमकुवत करणाऱ्यांविरोधात आयुष्यभर लढत राहणार.