Pradeep Pendhare
चिराग पासवान लोक जनशक्ति पक्षाचे प्रमुख असून, ते हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील सर्वात युवा मंत्री असून, ते केंद्रीय फूड प्रोसेसिंग मंत्री आहेत.
चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ति पक्षाने बिहारमध्ये पाच जागा लढवल्या होत्या आणि त्या पाचही जिंकल्या आहेत.
वय वर्षे 41 असलेले चिराग पासवान फिटनेसबाबत कमालीचे जागरूक असून, ते फिटनेसवर खूप मेहनत घेतात.
चिराग पासवान डाइट प्लानवर खूप लक्ष ठेवतात. सकाळचा नाश्ता ते भरपूर करतात, तर जेवणात डाळ-भात अन् लोणचं आवडते.
दिवसभरातून ते व्यायामासाठी एक तास देतात. दिल्लीत केंद्रीय कॅबिनेट बैठकांना सहभागी झाले, तरी नियमित व्यायाम करतात.
व्यायामात वेट ट्रेनिंगवर चिराग पासवान यांचा भर असतो, तसंच ते योगा देखील करतात.