Jagdish Patil
वाघनखांचे दर्शन आणि वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त साताऱ्यातील शिवतीर्थावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
ऐतिहासिक वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन करण्यात आलं.
सातारा शहरात वाघनखांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने स्वागत केले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा येथे ऐतिहासिक 'वाघनखां'च्या विशेष आकर्षणासह, शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन दालनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आलं.
सात महिने ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात असणार आहेत. प्रत्येक नागरिकांना या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्रीफडणवीस यांनी वाघनखांवरून झालेल्या वादावर प्रत्युत्तर दिलं आहे.
"आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अनेक वर्ष लंडनमध्ये असणारी वाघनखं भारतात आणली. काही लोकांचा वाद करणं हा एकमेव धंदा आहे. हा रोग आजचा नाही, त्याचा सामना शिवाजी महाराजांनाही करावा लागला," असं फडणवीस म्हणाले.