मुंबईची नवी ओळख : भारतातील पहिला ‘सिंगिंग रोड’ सुरू

Amit Ujagare

मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे.

Mumbai Musical Road

हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. याचं उद्घाटन CM देवेंद्र फडणवीस, DCM एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डनजवळ करण्यात आलं.

Mumbai Musical Road

या मार्गावरून उजवीकडील मार्गिकेवर प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव येणार आहे.

Mumbai Musical Road

वाहनचालकांना अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘जय हो’ या चित्रपटातील जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकता येईल.

Mumbai Musical Road

पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर ५०० मीटर लांब विशेष संगीतमय रिब्स (पट्ट्या) बसविण्यात आल्या आहेत.

Mumbai Musical Road

या पट्ट्यांमधील विशिष्ट अंतर आणि त्यावरून ताशी ६० ते ७० किलोमीटर प्रति वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या चाकाचे होणारे घर्षण यामुळे स्वरांची निर्मिती होते.

Mumbai Musical Road

हे स्वर वाहनात बसलेल्या प्रवाशांनाच ऐकू येणार आहेत, त्यामुळं हा अनोखा जगावेगळा प्रयोग मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे.

Mumbai Musical Road

आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञान, भारतीय संस्कृती आणि संगीताचा सुंदर मिलाफ म्हणून संगीतमय रस्ता देशभरात कुतूहलाचा विषय ठरणार आहे.

Mumbai Musical Road

Next : इन्स्टास्टार निर्मला नवलेंच्या पराभवाची कारणं काय?

Nirmala Navale | Photo by Insta @nirmala_shubham_nawale
इथं क्लिक करा...