Roshan More
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा आज (1 मार्च) हा जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या राजकीय कारकिर्द पाहू...
एम के स्टॅलिन यांचे वडील करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे स्टॅलिन यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांची ओळख मुख्यमंत्र्यांचा पुत्र अशीच होती.
स्टॅलिन हे मुख्यमंत्र्यांचे पुत्र असले तरी त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात डीएमके पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच केली.
1996 ते 2002 पर्यंत चेन्नईचे ३७ वे महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले.
एमके स्टॅलिन यांच्या जन्मानंतर चार दिवसांमध्ये सोव्हिएत रशियाचे नेते जोसेफ स्टॅलिन यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्या मुलाचे नाव स्टॅलिन असावे अशी इच्छा करुनानिधी यांची होती.
स्टॅलिन यांचा विवाह 1975 मध्ये दुर्गावती उर्फ सांता यांच्यासोबत झाला.
आणीबाणीला डीएमकेचा विरोध होता. त्यामुळे स्टॅलिन यांना 1976 मध्ये अटक करण्यात आली.
स्टॅलिन यांनी निवडणुकीच्या राजकारणात पाऊल ठेवताच त्यांचा पराभव झाला. 1984 थाऊजंड लाईट्स मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला.