Rajanand More
आंतरराष्ट्रीय कोर्टातील भारतीय न्यायाधीश. 2012 मध्ये सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश म्हणून राजीनामा दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्टात न्यायाधीश.
भंडारी यांच्या खंडपीठाने इस्त्रायलला गाझा पट्टीतील राफा शहरावरील हल्ला थांबवण्याचे आदेश दिले आहेत. इस्त्रायलसाठी हा झटका मानला जात आहे.
इस्त्रायल सेनेकडून फिलिस्तीनमध्ये नरसंहार केला जात असल्याचा आरोप करणारी दक्षिण आफ्रिकेची कोर्टात याचिका. कोर्टाकडून इस्त्रायलविरोधात आदेश.
भंडारी यांचा कार्यकाळ 2017 मध्ये संपला होता. पण त्यानंतर भारताने दुसऱ्यांदा भंडारी यांचेच नाव पुढे केले. त्यांना 193 पैकी 183 देशांची मतं मिळाली.
न्यायाधीश भंडारी यांचा जन्म राजस्थानमध्ये 1947 मध्ये झाला. अमेरिकेतील प्रसिध्द विद्यापीठात लॉ पदव्युत्तर पदवी मिळवली. काही दिवस शिकागोमध्ये वकिली.
अमेरिकेतून परतल्यानंतर राजस्थान हायकोर्टात वकिलीला सुरूवात. जोधपूर विद्यापीठात अर्धवेळ प्राध्यापक म्हणूनही काम केले.
1977 मध्ये सुप्रीम कोर्टात वकिलीला सुरूवात. 1991 मध्ये दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश. 2004 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा हायकोर्टाच मुख्य न्यायाधीश.
2005 मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती. सात वर्षांच्या काळात अनेक महत्वपूर्ण निकाल दिले.
न्यायाधीश भंडारी यांना भारत सरकारकडून 2014 मध्ये पद्म भूषण देऊन सन्मान. पहिला जस्टिस नागेंद्र सिंह इंटरनॅशनल शांतता पुरस्कारचेही मानकरी.