Chetan Zadpe
डिंपल यादव आणि अखिलेश यादव यांची प्रेमकहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कमी नाही. दोघांची भेट एका कॉमन मित्राच्या ओळखीतून झाली.
मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना मैनपुरीमधून उमेदवारी दिली आहे. त्यांचे सासरे नेताजी मुलायम सिंह यादव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे.
डिंपल यादव आणि अखिलेश यादव यांची प्रेमकहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. अखिलेश यादव इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना दोघांची भेट झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
अखिलेश यादव पहिल्यांदा डिंपल यांना भेटले तेव्हा त्या फक्त 17 वर्षांच्या होत्या आणि ते 21 वर्षांचे होते.
अखिलेश यादव आणि डिंपल यादव या दोघांचेही विचार जुळले. दोघांनी आधुनिक शिक्षण घेत नव्या विचारांची कास धरली आहे.
शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतरही अखिलेश यादव हे डिंपल यादव यांच्या संपर्कात राहिले. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते.अखिलेश यादव अनेकदा ऑस्ट्रेलियाहून डिंपल यांना पत्र पाठवत असत.
लग्नासाठी अखिलेश आणि डिंपल या दोघांनाही आपापल्या कुटुंबीयांची समजूत घालण्यासाठी खूपच प्रयत्न केले होते. खरे तर अखिलेश जेव्हा ऑस्ट्रेलियाहून परतले तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांकडून लग्नासाठी दबाव येऊ लागला. घरात डिंपलबद्दल कसे सांगायचे? हा प्रश्न अखिलेशसमोर होता.
मुलायम सिंह सुरुवातीला नाराज होते. मात्र अखिलेश यादव ठाम राहिले. मुलाच्या प्रेमापुढे नेताजींना नमते घ्यावे लागले. यानंतर डिंपलच्या वडिलांनीही या नात्यासाठी होकार दिला आणि 24 नोव्हेंबर 1999 रोजी दोघांनी लग्न केले.