Jagdish Patil
परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. पासपोर्ट शिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही.
हेन्ली पासपोर्ट इंडेक्सकडून जगभरातील पासपोर्टची रँकिंग जाहीर केली जाते.
जगातील सर्वात महागडा पासपोर्ट सिंगापूर, अमेरिका किंवा यूएईचा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे.
कारण जगातील सर्वात महाग पासपोर्ट मेक्सिको या देशाचा आहे.
या देशाच्या पासपोर्टच्या 10 वर्षांच्या वैधतेसाठी, जवळपास 19,481 रुपये द्यावे लागतात.
अमेरिकेच्या 10 वर्षांच्या पासपोर्टसाठी 13,868 रुपये तर ऑस्ट्रेलियाच्या पासपोर्टसाठी जवळपास 19,041 रुपये लागतात.
वार्षिक खर्चाच्या बाबतीत भारतीय पासपोर्ट हा दुसरा सर्वात स्वस्त पासपोर्ट आहे.
भारतीय पासपोर्टच्या 10 वर्षांच्या वैधतेसाठी जवळपास 1524.95 रुपये खर्च येतो.