Rashmi Mane
भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतानाच दिसत आहे, 2024 मध्ये तब्बल 2,06,378 भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही आकडेवारी परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच राज्यसभेत सादर केली असून, राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी याविषयी माहिती दिली आहे.
यामुळे 2024 मधील नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत किंचित कमी असली, तरी ती 2021 (1,63,370), 2020 (85,256) आणि 2019 (1,44,017) या वर्षांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे.
2019 पासून नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या वाढतच राहिल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतयं.
नागरिकत्वाचा त्याग करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यासाठी अर्ज दाखल करावा लागतो. हा अर्ज सादर केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होते आणि त्यानंतर साधारणतः 30 दिवसांच्या आत नागरिकत्व त्यागाचं प्रमाणपत्र दिलं जातं.
या आकडेवारीवरून भारतीय युवक, व्यावसायिक व उद्योजक परदेशात स्थायिक होण्याकडे का झुकतात, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
देशातील शिक्षण, रोजगार संधी, स्थिरता आणि जीवनमान या बाबी या निर्णयामागे महत्त्वाच्या असू शकतात, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.