Rashmi Mane
धारावीच्या राजकीय इतिहासात 1985 पासून येथे एकाच कुटुंबाचे वर्चस्व दिसून येते ते म्हणजे गायकवाड घराणे.
एकनाथ गायकवाड (INC) यांनी 1985 आणि 1990 मध्ये सलग निवडणुका जिंकून धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला होता. तेव्हापासून आजतागायत या घराण्याचे वर्चस्व आहे.
एकनाथ गायकवाड यांनी 1985, 1990 आणि 1999 मध्ये सलग निवडणुका जिंकल्या. यानंतर त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली आणि खासदार झाले.
एकनाथ गायकवाड त्यांच्या कन्या वर्षा या 2004 पासून येथील आमदार राहिल्या आहेत. वर्षा गायकवाड या सध्या खासदार आहेत. मात्र...
वर्षा गायकवाड यांनी 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर सलग चार निवडणुका जिंकल्या आहेत आणि त्या काँगेस पक्षाच्या एक प्रमुख चेहरा आहेत. त्या महाविकास आघाडीच्या मंत्रीही होत्या.
धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला पण काँग्रेसपेक्षा गायकवाड कुटुंबीयांचे वर्चस्व जास्त.
आता वर्षा गायकवाड यांना खासदारकी मिळाल्यामुळे धारावी मतदारसंघात वर्षा गायकवाड यांची बहीण डॉक्टर ज्योती गायकवाड इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत ज्योती गायकवाड या धारावी मतदारसंघात सक्रिय आहेत. अनेक सामाजित उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर गायकवाड कुटुंबाकडून पुन्हा दावा केला जाण्याची शक्यता आहे,