Pradeep Pendhare
काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसलेले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लेप्टोस्पायरोसिस आजार झाल्याचे निदान झाले आहे.
मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात मुख्यमंत्री भगवंत मान यांना प्रतिजैविक औषधे दिली जात आहेत असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आम आदमी पक्षाचे भगवंत मान पंजाबचे 17 वे विद्यमान मुख्यमंत्री असून, पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेत.
भगवंत मान यांनी त्यांची 2011मध्ये राजकीय वाटचाल मनप्रीत सिंह बादल यांच्या पंजाब पीपल्स पक्षातून केली होती.
पंजाब सर्वात मुख्यमंत्री असलेले भगवंत मान यांनी 2022 मध्ये धुरी येथून विधानसभा निवडणूक जिंकली.
राजकारण्यात येण्यापूर्वी भगवंत मान पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनय करायचे. कॉमेडी-शो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज'मध्ये देखील त्यांचा सहभाग होता.
लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा जीवाणूपासून संसर्ग होता. हा संसर्ग माणसांसह प्राण्यांमध्येही होतो. जागतिक स्तरावरील झुनोटिक रोगांपैकी एक आहे.
दूषित पाण्यात पोहणे, शेतीत काम करणे किंवा अस्वच्छ भागात राहिल्याने या रोगाचा संसर्ग होण्याचा धोका असतो.