Akshay Sabale
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबार झाला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्रध्यक्षांना लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. ते जाणून घेऊया.
जॉन विल्क्स बूथ नावाच्या अभिनेत्यानं 14 एप्रिल 1865 रोजी अब्राहम लिंकन यांच्या कानामागून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. यात लिंकन यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.
राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांच्यावर रेल्वे स्थानकातून जाताना चार्ल्स गुइटो नावाच्या व्यक्तीनं गोळ्या झाडल्या. त्यात गारफील्ड यांचा अडीच महिन्यांनी मृत्यू झाला.
न्यू यॉर्कमध्ये बफेलो येथे जमलेल्या नागरिकांशी हात मिळवत असताना राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्ली यांच्यावर गोळीबार. गोळ्यांच्या जखमांमुळे गँगरीन होऊन मॅककिन्ली यांचा मृत्यू.
जॉन एफ. केनेडी या तरुण राष्ट्राध्यक्षावर खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
वॉशिंग्टन डी. सी. येथे भाषण संपल्यानंतर ताफ्याकडे जात असताना गर्दीत असलेल्या जॉन हिंकले कनिष्ठ या व्यक्तीकडून राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर गोळीबार. त्यात रेगन बचावले.