Ashok Kharat Cinema: भोंदू खरातवर सिनेमा, त्यात चाकणकरांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला धमकीचे फोन; कोण आहेत दीपाली सय्यद?

Deepak Kulkarni

पुन्हा एकदा चर्चेत

अभिनेत्री दीपाली सय्यद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं राजकारणाशी जवळचं नातं राहिलं आहे.

Actor And Politican Deepali Sayyad | Sarkarnama

उत्तम नृत्यांगना

दीपाली सय्यद यांनी अनेक मालिका, जाहिरातींसह सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्या उत्तम नृत्यांगना असून रिअ‍ॅलिटी शोमध्येही परीक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे.

Actor And Politican Deepali Sayyad | Sarkarnama

राजकारणात एन्ट्री

दीपाली सय्यद यांनी अभिनयाची छाप पाडल्यानंतर त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्यांनी 2014 मध्ये अहिल्यानगरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता.

Actor And Politican Deepali Sayyad | Sarkarnama

शिवसंग्राम पक्षात प्रवेश

यानंतर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शिवसंग्राम या पक्षात प्रवेश केला होता.

Actor And Politican Deepali Sayyad | Sarkarnama

आपला सोडचिठ्ठी

3 ऑक्टोबर 2019 ला दीपाली सय्यद यांनी आपला सोडचिठ्ठी देत रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली होती.

Actor And Politican Deepali Sayyad | Sarkarnama

मोठी खळबळ

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणानं राज्यासह देशभरात मोठी खळबळ उडवली आहे. 

Actor And Politican Deepali Sayyad | Sarkarnama

चित्रपटाची घोषणा

मराठी दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांनी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' नाव असलेल्या अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. 

Actor And Politican Deepali Sayyad | Sarkarnama

चाकणकरांची भूमिका साकारणार

या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. पण याचदरम्यान,त्यांनी हादरवणारा दावा केला आहे.

Actor And Politican Deepali Sayyad | Sarkarnama

खळबळजनक दावा

अशोक खरात प्रकरणावरील आधारित चित्रपटात काम न करण्याबाबत दबाव टाकण्यात येत असून धमक्यांचे फोनही आल्याचा खळबळजनक दावा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला आहे.

Actor And Politican Deepali Sayyad | Sarkarnama

NEXT: CM विजय यांनी PM मोदींची भेट घेताच 12 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल; काय आहे खास?

CM Vijay meets PM Modi | Sarkarnama
येथे क्लिक करा...