वडील अन् भावाच्या अकाली मृत्यूनंतर राजकारणात एन्ट्री, 'इस्लाम'शी युती; टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्या शान-ए-हिंद यांची हिस्ट्री

Jagdish Patil

टिपू सुलतान

मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने मोठा वाद झाला.

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama

आक्षेप

त्यांच्या या कृतीवर शिवसेना आणि भाजपने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर हा फोटो हटवण्यात आला.

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama

राजकारण

मात्र, या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama

शान-ए-हिंद

याच पार्श्वभूमीवर ज्यांच्या दालनात टिपूचा फोटो लावला होका त्या शान-ए-हिंद कोण आहेत? ते जाणून घेऊया.

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama

उपमहापौर

मालेगावच्या विद्यमान उपमहापौर असलेल्या शान-ए-हिंद सलग 3 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama

वडील

जनता दलाचे दिवंगत नेते आणि मालेगावचे 7 वेळा आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांच्या त्या कन्या आहेत.

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama

आई

निहाल हे मालेगाव महापालिकेचे पहिले महापौर तर शान-ए-हिंद यांची आई सजेदा या नगर परिषदेच्या अध्यक्षा होत्या.

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama

पदवी

शान ए हिंद यांनी कायद्याची पदवी घेतलेय. मात्र, वडील आणि भावाच्या अकाली निधनामुळे त्या राजकारणात आल्या.

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama

सपा

2023 मध्ये एच. डी. देवेगौडांच्या नेतृत्वाखालील जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) भाजपशी युती केल्यामुळे त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला.

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama

विधानसभा

2024 ला सपाच्या तिकिटावरच त्यांनी विधानसभा लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama

युती

महापालिका निवडणुकीत त्यांनी 'इस्लाम' पक्षाशी युती केली. दोन्ही पक्षाला मिळून 40 जागा मिळाल्या. ज्यामध्ये सपाचे 5 नगरसेवक आहेत.

Shan-e-Hind Malegaon

NEXT : महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को टेस्ट; ही टेस्ट नेमकी कशी आणि का केली जाते?

Parli Mahadev Munde Case | Narco Test & Brain Mapping | Sarkarnama
क्लिक करा