Jagdish Patil
देशभरात आज 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. PM नरेंद्र मोदींपासून ते सर्वसामान्य नागरिक तो मनापासून साजरा करताना दिसत आहेत.
मात्र, स्वातंत्र्यदिन साजरा करताना राष्ट्रध्वजाचा वापर कसा करावा, याबाबतचे काही नियम आहेत ते जाणून घेऊया.
आपला राष्ट्रीय ध्वज, तिरंगा हा देशाच्या एकतेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. याच तिरंग्याबाबत काही नियम बनवण्यात आलेत.
राष्ट्रध्वजाच्या वापरासाठी फ्लॅग कोड ऑफ इंडिया अंतर्गत 2002 मध्ये काही नियमावली तयार करण्यात आलेय. याचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरदूतही करण्यात आली आहे.
तिरंग्यातील रंगाचा क्रम बरोबर असावा. तिरंग्यामध्ये सर्वात वरती भगवा रंग त्यानंतर पांढरा आणि खाली हिरवा रंग असावा. तिंरगा उलटा फडकवणे हा त्याचा अवमान आहे.
तसंच कधीही फाटलेला राष्ट्रध्वज फडकावू नये आणि फाटलेला ध्वज कचऱ्यात न फेकता तो आदरपूर्वक नष्ट करावा.
तिरंगा कधीही जमिनीवर ठेवू नये तसेच पाण्यातही बुडवू नये. तो नेहमी उंच आणि आदरणीय स्थानी ठेवा.
तर तिरंगा असलेले कोणतेही कापड, पडदा सजावट म्हणून वापरू नये. तसंच तिरंगा नेहमी इतर ध्वजांपेक्षा उंच फडकवा आणि तिरंगा सूर्यास्तानंतर उतरवावा.
राष्ट्रध्वज हा वैयक्तिक कामासाठी वापरू नये. तो टेबल किंवा कारमध्ये सजावट म्हणून ठेवू नये.