Rashmi Mane
1880 : सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट.
1896 : जागतिक कीर्तीचे पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्म.
1904 : ज्येष्ठ समाजवादी नेते व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू एस. एम. जोशी यांचा जन्म.
1927 : कोकण किनाऱ्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या "तुकाराम' आणि "जयंती' या दोन बोटी समुद्रात बुडाल्या. "टायटॅनिक' जहाजाइतकीच ही दुर्घटना कोकणात गंभीर मानली जाते.
1946 : थोर भारतीय नेते व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदनमोहन मालवीय यांचे निधन.
1959 : बहुजन समाजाच्या चळवळीतील नेते, स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव जेधे यांचे निधन.
1993 : "नाशक' या क्षेपणास्त्रनौकेचे मुंबई येथे जलावतरण. माझगाव गोदीत बांधण्यात आलेली ही तिसरी क्षेपणास्त्रनौका आहे.
1998 : नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या लहान पल्ल्याच्या, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या "त्रिशूल' क्षेपणास्त्राची कोची येथील "आयएनएस द्रोणाचार्य' या तळावर यशस्वी चाचणी.
1998 : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाविना मायदेशी येण्याची सुविधा देणारी "पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन' (पीआयओ) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून जाहीर.