सरकारनामा ब्यूरो
सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या अंशिका वर्मा या सध्या चर्चेत आल्या आहेत.
अंशिका यांच मूळ गाव यूपीतील प्रयागराज जिल्ह्यातील असून त्या 2021 च्या बॅचच्या 'आयपीएस' अधिकारी आहेत.
अशिंका यांनी त्यांचं शालेय शिक्षण नोएडा येथून पूर्ण केलं. तेथूनचं त्यांनी 'बी.टेक'ची पदवी मिळवली आणि त्यांनतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
कोणत्याही कोचिंग शिवाय UPSCची परीक्षा पास करत, त्या IPS झाल्या. अंशिका यांना पहिल्यांदा आग्राच्या फतेहपूर येथे 'एसएचओ' आणि त्यानंतर गोरखपूर येथे 'एएसीपी' म्हणून नेमण्यात आले होते.
अंशिका या त्यांच्या दमदार कामासाठी ओळखल्या जातात. त्यांनी 'एएसपी' म्हणून अनेक महत्वाच्या केसेस त्यांच्या नावावर आहेत.
गोरखपूरमधील एक केसामुळे त्या खूप चर्चेत आल्या होत्या. यात बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन त्यांनी गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले होते. त्यावेळी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं.
अशाच धाडसी कार्यामुळे नुकतीच त्यांच प्रमोशन झाल असून त्यांची बरेली येथे SP म्हणून पोस्टिंग करण्यात आली आहे.