Rashmi Mane
1889 - स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. त्यांना लहान मुलांची अतिशय आवड असल्याने हा दिवस "बालदिन' म्हणून साजरा केला जातो. 1955 मध्ये "भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आला.
1969 - दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते उद्घाटन.
1991 - जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची 1990 च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड जाहीर.
1993 - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधी यांचे सच्चे अनुयायी आणि निःस्पृह गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन. भारतातील दुधाचा महापूर योजना यशस्वी होण्यास त्यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले.
1997 - संरक्षण राज्यमंत्री एन. व्ही. एन. सोमू यांचे अरुणाचल प्रदेशात हेलिकॉप्टर कोसळून निधन.
२००८ - पृथ्वीपासून ३ लाख ८६ हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रावर तिरंगा फडकाविण्याची अतुलनीय कामगिरी भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखविली. अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरला.
२०१५ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करून महाराष्ट्र सरकारने या महान नेत्याला अनोखी मानवंदना दिली.