Dinvishesh 19 November : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा!

Rashmi Mane

1917 - भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा विजय झाला व बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यांना "भारतरत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले.

1969 - अमेरिकेच्या अपोलो अंतराळयानातून चार्ल्स काॅनराड आणि अॅलन बिल चंद्रावर उतरले

1982 - नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात

1992 - नागालँडचे माजी मुख्यमंत्री जमीर गोळीबारात जखमी

1997 - कुप्रसिद्ध गुंड प्रमोद माळवदकरचा पुणे पोलिसांकडून खातमा

2000 - ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना प्रतिष्ठेचा इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते प्रदान.

2001 - तमिळनाडूत गुटखा, पानमसाला व चघळण्याच्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आली.

2015 - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकी राजकीय नेत्या स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली.

Next : दिवसा प्रॅक्टिस अन् रात्री UPSC ची तयारी डॉक्टर बनल्या IPS अधिकारी

येथे क्लिक करा