Dinvishesh 28 November : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा!

Rashmi Mane

1753 : मराठा सैन्यातील पहिल्या महिला सेनापती उमाबाई दाभाडे यांचे निधन.

28 November 1753 | Sarkarnama

1890 : श्रेष्ठ समाजसुधारक, विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचे निधन. स्त्री हक्क, स्त्रीदास्य विमोचन, स्त्रियांचे समान हक्क या सर्व विचारांना महात्मा फुले यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली व स्त्री जीवनात शिक्षणाची नवी पहाट उजाडली.

28 November 1890 | Sarkarnama

1964 : नासाचे मरिनर - ४ या अंतराळयानाची मंगळ मोहिमेसाठी झेप

28 November 1964 | Sarkarnama

1967 : मुळशी सत्याग्रहाचे नेते, थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती पांडुरंग महादेव बापट यांचे निधन. त्यांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध मुळशीचे बंड करून स्वातंत्र्यलढ्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले. महायोगी अरविंदांचा "लाईफ डिव्हाईन' या ग्रंथाचा त्यांनी अनुवाद केला व "दिव्य जीवन' हा अप्रतिम अनुवाद ग्रंथ सिद्ध झाला.

28 November 1967 | Sarkarnama

2000 : महाराष्ट्र राज्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वाहनांमधून मंजूर क्षमतेच्या दीडपटीपेक्षा जास्त विद्यार्थी नेऊ नयेत, असा उच्च न्यायालयाचा आदेश.

28 November 2000 | Sarkarnama

2004 : रशियाच्या तांत्रिक सहकार्यातून ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेडमध्ये (एचएएल) तयार करण्यात आलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची बहुउपयोगी "सुखोई-30' लढाऊ विमाने देशाला अर्पण. आवाजापेक्षाही अधिक गतीने उडणाऱ्या 26 टन वजनाच्या व सर्व प्रकारच्या आण्विक व पारंपरिक क्षेपणास्त्रांसह अचूक बॉंबफेकीची क्षमता असलेले हे विमान आहे.

28 November 2004 | Sarkarnama

2008 - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठीच्या एनएसजीच्या कारवाईत मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद

28 November 2008 | Sarkarnama

Next : एकाच कुटुंबातच आमदार-खासदार; भाजपसह सर्वच पक्षांना घराणेशाही प्रिय

येथे क्लिक करा