Rashmi Mane
1858 : "लाल-बाल-पाल' या त्रयीतील गाजलेले स्वातंत्र्यसेनानी बिपिनचंद्र पाल यांचा जन्म.
1888 : भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया घालण्याची महत्त्वाची कामगिरी करणारे नोबेल पारितोषिक विजेते भारतीय पदार्थशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा जन्म. 1954 मध्ये भारत सरकारने त्यांना "भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार बहाल केला. 1957 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय लेनिन ऍवॉर्ड पुरस्काराने गौरविले.
1984 : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोनाल्ड रेगन यांचा विजय
1988 : महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची २२० कोटींची कर्जे माफ करण्याचा तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार सरकारचा निर्णय
1990 : केंद्रातले विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठरावात पराभव
2000 : ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अर्ध्वयू सी. सुब्रह्मण्यम यांचे निधन.
2003 -:दिल्लीत गाजलेल्या तंदूर कांड प्रकरणातला आरोपी सुशील शर्मा याला फाशीची शिक्षा जाहीर
२००४ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या धनुष या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चंडीपूरपासून तीस किलोमीटर अंतरावर समुद्रात ‘आयएनएस सुभद्रा’वरून यशस्वी चाचणी.
२०१५ : भारतीय लष्कराने जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली.