Rashmi Mane
जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहास घडवला आहे.
या निवडणुकीत त्यांनी बहुमताचा आकडा पार केला असून ते पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. ते अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष असणार आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे जगातील सर्वात शक्तिशाली नेता म्हणून पाहिले जाते.
याचे कारण म्हणजे अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश तर आहेच, पण अनेक जागतिक संस्थांवरही त्याचा जास्त प्रभाव आहे.
अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा वार्षिक पगार 4 लाख डॉलर्स म्हणजे ३.३६ कोटी रुपये आहे. त्याला खर्चासाठी दरवर्षी 50 हजार डॉलर्स (42 लाख रुपये) वेगळी रक्कम मिळते.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सीक्रेट सर्व्हिस एजंट्सद्वारे हाताळली जाते.