Rashmi Mane
1962 : स्त्रीशिक्षणाचे महान प्रसारक, महिला विद्यापीठाचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे निधन. त्यांना "भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे
1988- अमेरिकेच्या अध्यक्षपदी जाॅर्ज बुश यांची निवड
1989 - अयोध्येत नियोजित राममंदिराचा शिलान्यास
1996 - जळगाव वासनाकांड प्रकरणाचा कौशल्याने तपास करणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी दीपक जोग यांचे निधन
2000 : भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत झालेली शिक्षा उच्च न्यायालयाने कमी करू नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. शिक्षा कमी केल्याने भ्रष्टाचाराला उत्तेजन मिळेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
2003 : ध्वनीच्या वेगाने प्रवास करणाऱ्या "ब्राह्मोस' क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी. हे 290 किलोमीटर पल्ल्यापर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र दोनशे किलोपर्यंत वजनाची पारंपरिक शस्त्रे वाहून नेऊ शकते.
2005 - माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन