Dinvishesh 10 November : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा!

Rashmi Mane

1659 : शिवाजी महाराजांना जिवंत अथवा मृत पकडून आणण्याचा विडा उचलणारा विजापूरचा सरदार अफजलखान याचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.

1848 : अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म.

1919 : एके ४७ बंदुकीचे निर्माते मिखाइल कलाश्निकोव्ह यांचा जन्म

1938 : तुर्कस्तानातील पारंपरिक राजवट संपवून प्रजासत्ताक स्थापन करणारे व आधुनिकता आणणारे अध्यक्ष मुस्तफा केमाल पाशा यांचे निधन.

1958 : बडोद्याजवळ वेदसार येथे विहिरीमध्ये तेल सापडले

1990 : देशाचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे स्वीकारली

2001 : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम यांची केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती.

2006 : श्रीलंकेच्या संसदेतील तामीळ वंशाचे सदस्य नादराजा रविराजा यांची कोलंबोत हत्या

Next : इंजिनिअरींग, MBA करूनही ती समाधानी नव्हती; पोरीनं करिअरची दिशा बदलली अन् आयएएस झाली

येथे क्लिक करा