National anthem : राष्ट्रगीताचा अपमान कराल तर होईल तुरुंगवास! किती वर्षांची शिक्षा माहीत आहे का?

सरकारनामा ब्यूरो

नितीश कुमार

सध्या सोशल मीडियावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एका कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Nitish Kumar | Sarkarnama

काय आहे व्हिडिओमध्ये?

नितीश कुमार या व्हिडिओमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना शेजारी उभे असलेले प्रधान सचिव दीपक कुमार यांच्याशी बोलताना दिसत आहेत.

Nitish Kumar | Sarkarnama

राष्ट्रगीताचा अपमान

भारतीय कायद्यात नमूद केल्याप्रमाणे कोणताही व्यक्ती भारतीय राष्ट्रगीताचा अपमान करत असेल तर तो गुन्हा असून त्याला शिक्षा होऊ शकते.

National anthem | Sarkarnama

कायदा

भारतीय संसदेने राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रगीत, संविधान आणि भारताच्या नकाशासारख्या राष्ट्रीय चिन्हांचा अपमान केल्यास प्रतिबंध करण्यासाठी कायदा बनवलेला आहे.

National anthem | Sarkarnama

कोणती शिक्षा होणार?

राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा (PINH) 1971 अंतर्गत अशा व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते.

National anthem | Sarkarnama

संविधान

भारतीय संविधानाच्या कलम 51अ मध्ये असे सांगितले आहे की, देशातील सर्व नागरिकांनी राष्ट्रगीताचा आदर करणे बंधनकारक आहे.

National anthem | Sarkarnama

काय आहे नियम?

राष्ट्रीय सन्मान (PINH) कायदा, 1971मध्ये म्हटल्याप्रमाणे, राष्ट्रगीत सुरु असल्यावेळी स्तब्ध स्थितीत न उभ राहता कोणत्याही प्रकारे हालचाल करून अपमान करणे चुकीचे आहे.

National anthem | Sarkarnama

NEXT : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याची कोटींची उड्डाणे; 2 वर्षांत तब्बल 258 कोटी रुपये खर्ची...

येथे क्लिक करा...