Deepak Kulkarni
गुजरातच्या संतोकबेन साराभाई जडेजा यांची गॉडमदर म्हणून ओळखले जाते. पतीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी त्यांनी पोरबंदरमध्ये 14 लोकांची हत्या केली होती. संतोकबेनवर 500 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
चंबळच्या खोऱ्यांमध्ये फुलन देवी यांची मोठी दहशत होती. सामूहिक बलात्कार केल्यामुळे बेहमई गावात त्यांनी तब्बल 22 ठाकूरांची हत्या केली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर समाजवादी पार्टीच्या तिकिटावर त्या खासदारही झाल्या. पण त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण असलेल्या हसीना पारकरचा गुन्हेगारी विश्वात आणि नागपाडा परिसरात मोठा दबदबा होता. तिला गॉडमदरही म्हटलं जात होतं. दाऊदचे मुंबईतील सगळे अवैध धंद्यांची जबाबदारी ती सांभाळत होती.
अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. पण डॉन बबलू श्रीवास्तवच्या संपर्कात आल्यानंतर ती किडनॅपिंग क्वीन म्हणून उदयास आली. भारतातील नामवंत लोकांकडून तिने प्रचंड पैसे उकळल्याचंही बोललं जातं.
गँगस्टर अश्विन नायकची नीता ही पत्नी आहे. आश्विन तुरुंगात असताना नीतानेच बाहेरचे सगळे अवैध धंदे सांभाळले होते. तिची त्यावेळी प्रचंड दहशत होती. पण 2000 मध्ये अश्विनने नीताची त्याच्याच टोळीकडून हत्या घडवून आणली.
ब्युटीशियन असलेल्या रुबीनाने झटपट श्रीमंत होण्याच्या मोहामुळे गुन्हेगारीचा मार्ग निवडला. गँगस्टर छोटा राजनशी तिने जवळीक वाढवली होती. आपल्या सौंदर्याने पोलीस अधिकाऱ्यांसह कित्येकांना जाळ्यात अडकवले होते.
त्यावेळचे अंडरवर्ल्डमधले मोठे प्रस्थ असलेले करीम लाला, हाजी मस्तान आणि क्राइम ब्रँचचे काही अधिकारीही जेनाबाई दारुवालीकडे ये-जा करत. विशेष म्हणजे तिने मक्केतील 22 डॉन एकत्र आणण्यात मोठी भूमिका निभावली होती. स्वत:ची कुठलीही टोळी नसताना जेनाबाईची मोठी दहशत होती.
हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणारी सोनू पंजाबन 2017 मध्ये पोलिसांनी 13 वर्षांची शिक्षा ठोठावली होती.
केडी केम्पम्मा ही एक सिरीयल किलर म्हणून ओळखले जाते. श्रीमंत महिलांना तिने टार्गेट केलं होतं. केडी केम्पम्माने आठ वर्षांत 6 खून केले. धक्कादायक म्हणजे 2007 साली अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत तिने पाच खून केले. तिला सायनाइड मलिका असेही ओळखले जाते.
गँगस्टर अबू सालेमची पत्नी समीरा जुमानीचं नाव फसवणूक, खंडणी, बॉम्बस्फोट यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही समोर आलं आहे. समीरा अद्यापही पोलिसांना सापडलेली नाही. ती परदेशात लपल्याचे बोलले जात आहे.