सरकारनामा ब्यूरो
काही महिला IAS, IPS अधिकारी असतात ज्या त्यांच्या हुशारीनेचं नाही तर, स्मार्टनेससाठीही ओळखल्या जातात.
कोण आहेत त्या महिला अधिकारी ज्यांची सोशल मीडियावरही प्रचंड 'क्रेझ' असते. आणि कशी आहे त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊयात.
प्रियांका गोयल या त्यांच्या हुशारी आणि स्मार्टनेससाठी ओळखल्या जातात. 2023 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण करत त्या IAS बनल्या. सध्या त्यांची नियुक्ती मध्य प्रदेश जिल्ह्यातील अनूपपुर येथे करण्यात आली आहे. त्यांचे इन्स्टाग्रामवर तब्बल 184K फॉलोअर्स आहेत.
अंशिका वर्मा या उत्तर प्रदेश केडरच्या IPS अधिकारी आहेत. त्यांनी 2019 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. यूपी केडरमधील सर्वात सुंदर IPS अधिकारी म्हणून त्या सर्वपरिचित आहेत.
ब्युटी विथ टॅलेंट'चे उत्तम उदाहरण म्हणजे झारखंड केडरच्या IAS गरिमा सिंह. त्या 2012 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 'IPS' अधिकारी झाल्या. यानंतर 2016 ला पुन्ही UPSC परीक्षा क्रॅक करत 'IAS' बनल्या.
पी. मोनिका या तेलंगण केडरच्या अधिकारी असून जबरदस्त फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. त्या 2021 मध्ये IPS बनल्या. फिटनेससाठी प्रसिध्द असलेल्या मोनिका सध्या तेलंगणा येथे कार्यरत आहेत.
अवघ्या 23 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत स्मिता सभरवाल या भारतातील सर्वात तरुण महिला IAS अधिकारी बनल्या आहेत. युवक प्रगती, पर्यटन आणि संस्कृती सचिव या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.