Chetan Zadpe
भारतातील व्यंगचित्रकेलचा इतिहास पाहिले तर समजते की, के शंकर पिल्लई यांना भारतीय व्यंगचित्रकारांचे जनक असे संबोधले जाते. देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे ते आवडत्या व्यंगचित्रकारांपैकी एक होते.
व्यंगचित्राच विषय निघाला की, पहिलं नाव आर के लक्ष्मण यांचे घेतले जाते. रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण असे त्यांचे संपूर्ण नाव आहे. त्यांनी रेखाटलेला 'काॅमन मॅन' जगभरात पोहचला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते. त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे आजही प्रचंड लोकप्रिय आहेत.
दक्षिण भारतातील एक प्रसि्दध पॉकेट व्यंगचित्रकार म्हणून राममूर्ती यांची ओळख आहे.
मारिओ मिरांडा हे एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत. आपल्या व्यंगचित्रांतून त्यांनी गोव्याची संस्कृती, तेथील जीवनशैली लोकांपुढे आणली.
केरळमधील व्यंगचित्रकार वि टी थॉमस यांची व्यंगचित्रांंनी लहान मुलांना अक्षरश: वेड लावले होते.
एन के रंगनाथन या एक प्रसिद्ध चित्रकार आहेत. जगभरातील नामांकित व्यक्तिंच्या स्वाक्षरी असेलल्या चित्रांचाही त्यांच्याकडे संग्रह आहे.
हरीश चंद्र शुक्ला यांनी विपुल प्रमाणात चित्रे काढली आहेत. त्यांची व्यंगचित्रे वर्तमानपत्रातून लोकांपर्यंत पोहोचली